सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रशालेय शिक्षण व क्रीडासामाजिक कार्य

शौर्य शाहिरीचा आस्वाद घेण्याची संधी

शौर्य शाहिरीचा आस्वाद घेण्याची संधी….

वसमत…. प्रतिनिधी….

येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त प्रसिद्ध वक्ते व गायक श्री गजानन जाधव यांच्या शौर्य शाहिरीचा आस्वाद घेण्याची संधी महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक यांना मिळणार आहे. दिनांक १८ व १९ मार्च रोजी यावर्षीचे स्नेहसंमेलन आयोजित केले असल्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा समन्वयक डॉ सुभाष क्षीरसागर यांनी सांगितले. दोन दिवस विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून कला व क्रीडा प्रेमी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ मा मा जाधव यांनी केले आहे.


१८ तारखेला सकाळी क्रीडा ज्योतीच्या शहरातील फेरीने स्नेहसंमेलनाला सुरुवात होणार आहे, त्यानंतर उद्घाटन कार्यक्रम, विविध स्पर्धा व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम तर १९ तारखेला विविध कार्यक्रमांचे आयोजन असुन ४ वाजता महाराष्ट्रातील लोकप्रिय साहित्यिक, कवी व वक्ते प्रा विश्वाधार देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button