Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य
गणेशोत्सव शांतता समिती बैठकीच्या वेळेत बदल

गणेशोत्सव शांतता समिती बैठकीच्या वेळेत बदल
उदगीरमध्ये आता सकाळी १० वाजता बैठक
उदगीर, दि. ७ : श्री गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समिती बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित दुपारी ३ वाजताची बैठक आता मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे.
ही बैठक पोस्ते मंगल कार्यालय, नळेगाव रोड, उदगीर येथे आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन, पोलीस विभाग तसेच शांतता समितीतील संबंधित सदस्य आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी आणि निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासन व पोलीस उपविभाग, उदगीर यांच्या वतीने करण्यात आले आहे.














































