जे. जे. रुग्णालयात MBBS प्रवेशाने खुशी बावगेची वैद्यकीय क्षेत्रात भरारी
शाल, पुष्पगुच्छ व मिठाई भरवून सन्मान करत पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

जे. जे. रुग्णालयात MBBS प्रवेशाने खुशी बावगेची वैद्यकीय क्षेत्रात भरारी
शाल, पुष्पगुच्छ व मिठाई भरवून सन्मान करत पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
उदगीर प्रतिनिधी : जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर बावगे खुशी बसप्पा हिने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. (J.J.) समूह रुग्णालये येथे #MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल खुशीचा उत्साहात सन्मान करण्यात आला.
खुशीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला शाल पांघरून, पुष्पगुच्छ देऊन तसेच मिठाई भरवून तिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशाचा आनंद व्यक्त करत उपस्थितांनी पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या आणि प्रतिष्ठित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविणे ही अभिमानाची बाब मानली जाते. खुशीने मिळविलेले हे यश तिच्या मेहनतीला मिळालेली पावती असून, तिच्या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याप्रसंगी श्रीकांत पाटील, बसप्पा बावगे सर, ज्ञानोबा मुंडे सर, श्रीनिवास ऐतवार सर, प्रा. तुकाराम शिंदे, कल्याण बिरादार सर, संतोष सूर्यवंशी सर, मल्लिकार्जुन वारकरे, यश वारकरे आणि राजेंद्र सुगावे उपस्थित होते.
खुशीने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत समाजाची सेवा करावी आणि आपल्या कर्तृत्वाने कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा सदिच्छा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.







































