राहुल गुप्ता हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळणार

राहुल गुप्ता हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळणार
(वसमत प्रतिनिधी) राहुल गुप्ता हे हिंगोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी असतील, लवकरच ते आपला पदभार सांभाळणार आहेत. हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची अवघ्या सात महिन्यांत हिंगोलीहुन बदली झाली आहे. श्री अभिनव गोयल यांची छोटीशी कारकीर्द यशस्वी राहिली. त्यांची बदली रद्द करावी म्हणून नागरिकांनी पत्र व्यवहार केला होता तसेच आंदोलन करण्याची तयारी दाखवली होती पण प्रशासनाने राहुल गुप्ता यांची हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केली आहे.
श्री राहुल गुप्ता यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा, CSE 2017 मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विषयात 5 व्या क्रमांकासह उत्तीर्ण केली आहे. राहुल गुप्ता यांनी संभाजीनगर येथील महावितरण महाडिस्कॉमचे सहव्यवस्थापकीय संचालक तसेच उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. प्रथमच जिल्हाधिकारी म्हणून पदस्थापना होणारे हिंगोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी या नात्याने राहुल गुप्ता यांच्यासमोर जिल्ह्याचे मागासलेपण, वीजपुरवठा,तीव्र जलसंकट, औद्योगिकीकरण नसलेला जिल्हा, सिंचन व्यवस्था, शिक्षणाचा दर्जा, महसूल विभागाच्या जमिनीवरील अवैध धंदे, अतिक्रमण आदी प्रमुख आव्हाने असतील.