सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसरकारी योजना

पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचारी रस्त्यावर

उदगीरात एकजुटीची ताकद दाखवत राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचारी रस्त्यावर

उदगीरात एकजुटीची ताकद दाखवत राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर | प्रतिनिधी

पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत आणि विविध मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, या मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय संपाची धग उदगीरातही पाहायला मिळाली. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या नेतृत्वाखाली उदगीरातील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली.

हातात लाल झेंडे, मागण्यांचे फलक आणि जोरदार घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. ‘पाच दिवसांचा आठवडा लागू करा’ या प्रमुख मागणीसह बँक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत यापूर्वी अनेकदा चर्चा आणि बैठका झाल्या आहेत. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्याने अखेर संघटनांनी संपाचे हत्यार उपसले. उदगीरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आल्याने आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी संघटित शक्तीचे दर्शन घडवत मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या आंदोलनात संघटनेचे प्रवीण माने, जसकीरातसिंग सेठी, मनोज वाघदरीकर, मोहित गोंजाळविस, शंकर कमाले, विवेक करपे, बालाजी तोगरगे यांच्यासह विविध बँकांतील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे उदगीरातील बँक कर्मचारी आंदोलनाला एकजुटीचा मजबूत आवाज मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button