मयुर जगळपुरे यांचे जागतिक पातळीवरील यश !

मयुर जगळपुरे यांचे जागतिक पातळीवरील यश !
सिंगापूर येथील Nanyang Technological University मधून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत जगभरातून सहभागी झालेल्या स्पर्धेमध्ये यश मिळवत मयुर ने कोरले जागतिक स्तरावर आपल्या देशाचे नाव! लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र, जिद्दी, विचारपूर्वक निर्णय घेणारा, मनमिळावू व हळव्या स्वभावाचा असा सर्वांशी सहज जुळणारा व्यक्तीमत्त्व असलेला मयुर गुगल बॉय म्हणून सुपरिचित आहे.
अगदी बालवयातच ‘महाराष्ट्राचा पहिला जिनियस’ बनून राज्याचं नाव देशपातळीवर उज्ज्वल करणारा मयुर आज देशाची मान जगभरात उंचावत आहे. वाढत्या वयातही त्याची तीच ती जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी अजूनही तितकीच तीव्र आहे. ‘आकाशाला गवसणी घाल;पण पाय नेहमी जमिनीवर ठेव’ ही भूमिका मयुर अत्यंत साधेपणाने जपतो आहे हे खरोखरच प्रेरणादायी आहे.
नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन विद्यापीठ व SEA-ASEAN केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘The Netherlands – Asia Pacific Student Short Video Competition for Climate Change and Sustainable Development in Global Cities’ या जागतिक स्तरावरील स्पर्धेत जगभरातील विविध नामवंत विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मयुर जगळपुरे ह्यांच्या ‘Innovation and Greening of the City for Climate Adaptation: Singapore’ या विषयावरील सादरीकरणासाठी ‘Honourable Mention’ हा सन्मान प्राप्त झाला आणि त्यासोबतच ५०० युरो (सुमारे ₹४९,०००) चे पारितोषिकही मिळाले . मयुरचे हे यश केवळ वैयक्तिक नाही तर कुटुंबासाठी, विद्यापीठासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे.त्याच्या ह्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे!