सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताचालू घडामोडीताज्या बातम्याशालेय शिक्षण व क्रीडासरकारी योजना

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी सुवर्णसंधी; इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू

३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी सुवर्णसंधी; इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू

३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी

लातूर, : जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी सध्या इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेले तसेच ज्यांचा जन्म १ मे २०१५ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत झाला आहे, असे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. प्रवेश परीक्षा शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ navodaya.gov.in वर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असल्याने शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button