सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने उद्या मानवतला गुढीपाडवा उत्सव व संचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने उद्या मानवतला गुढीपाडवा उत्सव व संचलन

मानवत प्रतिनिधी : मानवत तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शुक्रवारी ता 28 सकाळी साडेआठ वाजता गुढीपाडवा उत्सव व संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते मुख्य रस्ता व गणपती विसर्जन मार्गाने निघणाऱ्या या संचलनात तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सदस्य गणवेशात उपस्थित राहणार आहेत. शहरातील माहेश्वरी भवन मंगल कार्यालयात होणाऱ्या गुढीपाडवा उत्सव कार्यक्रमास प्रांत धर्म जागरण प्रमुख सिद्धेश्वर बिराजदार हे मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यशवाडी त्रिमूर्ती हनुमान संस्थानचे पिठाधीश स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, व जिल्हा संघचालक ऍड मुकुंदराव चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. संचलनासह कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका संघचालक वैभव पोकळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button