मानवतला चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनमालेचे आयोजन

मानवतला चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनमालेचे आयोजन
मानवत प्रतिनिधी: स्वामी दिव्यानंद सत्संग परिवाराच्या वतीने स्वामी दिव्यानंद पुरी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार ता 15 महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांचे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पसायदान या विश्वप्रार्थनेवर प्रवचन मालाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील शिवाजीनगर मध्ये दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिराच्या भव्य सभागृहात 15 ते 17 एप्रिल सायंकाळी सात ते नऊ या वेळेत सदरील प्रवचनमाला संपन्न होणार आहे.
प्रवचनमालेस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष दिव्यानुभुती केंद्राचे पिठाधीश महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरी महाराज, कार्याध्यक्ष चैतन्योदय गुरुकुल आश्रम जिंतूर चे स्वामी महेशानंदपुरी महाराज, स्वागताध्यक्ष आमदार राजेश विटेकर, उपाध्यक्ष बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर व युवा नेते डॉ अंकुश लाड यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक म्हणून रामराव महाराज हेंडगे, पंडित महाराज डाके, बालासाहेब रोडे, दत्तप्रसाद बांगड, कल्याणराव शिंदे, बालाजी पोकळे, मोहन लाड, डॉ पंकज ढमढेरे, अशोक देशमाने, ज्ञानेश्वर मोरे, संजय लड्डा, डॉ. राजकुमार लड्डा, संजय नाईक, प्रसाद जोशी, एड अनिरुद्ध पांडे व रामभाऊ शिंदे हे प्रयत्नशील आहेत.