सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रशालेय शिक्षण व क्रीडासामाजिक कार्य

नूतन मराठी प्राथमिक शाळेत बालिका दिवस साजरा

नूतन मराठी प्राथमिक शाळेत बालिका दिवस साजरा

अहमदपुर  प्रतिनिधी : अहमदपूर येथील नूतन मराठी प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत आल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रसंग नाट्यरूपाने सादर केले. काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर भाषणे केली. शाळेतील सर्व शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्रीमती पोलावार एस.पी. श्रीमती कुलकर्णी एस एस,पुठेवाड एस जी, कोतलापुरे एस पी.,बेंबळे एन एम, ऊपरवाड एस एच,बिरादार पी डी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला. श्रीमती देशमुख एम एस यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेबजी देशमुख व संस्थेचे सचिव अक्षय भैया देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पोलावार एस पी. यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button