सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताचालू घडामोडीराजकारणसरकारी योजनासामाजिक कार्य

राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजावर तीन दिवस परिणामाची शक्यता

राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजावर तीन दिवस परिणामाची शक्यता

२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशव्यापी बँक संपाचे आवाहन

सलग पाच दिवस शाखा व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता, ग्राहकांना आगाऊ नियोजनाचा सल्ला

 

उदगीर : प्रतिनिधी – युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने २८, २९ आणि ३० सप्टेंबर २०२६ रोजी देशव्यापी बँक संपाचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील अर्थात राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमधील नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक यांसह सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांच्या शाखांमधील प्रत्यक्ष ग्राहक सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

२६ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने २८ ते ३० सप्टेंबरच्या संपासह काही ग्राहकांना सलग पाच दिवस शाखा व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र, ग्राहकांच्या सोयीसाठी २७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपाच्या काळात शाखांमधील प्रत्यक्ष व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि यूपीआय यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर ग्राहकांना करता येणार आहे. मात्र, प्रत्यक्ष शाखेत होणारे काही व्यवहार आणि धनादेश प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असलेल्या ग्राहकांनी रोख रक्कम, धनादेश, बँक हस्तांतरण तसेच इतर महत्त्वाचे व्यवहार शक्य असल्यास संपापूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन बँकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button