सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताचालू घडामोडीताज्या बातम्याशालेय शिक्षण व क्रीडासरकारी योजना

महाडीबीटीवरील अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रलंबित अर्ज तात्काळ जिल्हास्तरावर पाठवा

नांदेड जिल्हा प्रशासनाचे महाविद्यालयांना आवाहन

महाडीबीटीवरील अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रलंबित अर्ज तात्काळ जिल्हास्तरावर पाठवा

नांदेड जिल्हा प्रशासनाचे महाविद्यालयांना आवाहन

नांदेड | प्रतिनिधी

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी जुने महाडीबीटी पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महाविद्यालय व विद्यार्थीस्तरावरील पात्र अर्ज जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविता येणार आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या लॉगीनमध्ये प्रलंबित असलेले पात्र अर्ज तातडीने तपासून जिल्हास्तरावर वर्ग करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या कालावधीनंतर जुने महाडीबीटी पोर्टल कायमचे बंद होणार असून, त्याऐवजी #MahaDBT 2.0 हे अद्ययावत पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या पोर्टलवरील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहू नयेत, यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तसेच शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१५ सप्टेंबर अंतिम मुदत

१५ सप्टेंबर २०२६ ही जुन्या महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची अंतिम संधी आहे. त्यानंतर जुन्या प्रणालीवरील कोणताही प्रलंबित अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच अशा अर्जाची केंद्रहिश्श्याची रक्कम शासनाकडून अदा केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये आणि भविष्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्व महाविद्यालयांनी विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पात्र अर्जांची तातडीने पडताळणी करून ते जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठवावेत आणि आपल्या स्तरावर झिरो पेंडन्सी म्हणजेच शून्य प्रलंबितता राखावी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी महाविद्यालयांनी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड श्री. शिवानंद मिनगीरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button