सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताचालू घडामोडीताज्या बातम्यासरकारी योजना

बँक कर्मचाऱ्यांचा उद्या देशव्यापी संप

बँक कर्मचाऱ्यांचा उद्या देशव्यापी संप

युनियन बँकेच्या ग्राहकांना व्यवहारांचे नियोजन करण्याचे आवाहन

उदगीर | प्रतिनिधी

सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) नेतृत्वाखाली शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे बँकांच्या शाखांमधील नियमित व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता असून, ग्राहकांची काहीशी गैरसोय होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर युनियन बँक ऑफ इंडिया, उदगीर शाखेने ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. संपामुळे ११ सप्टेंबर रोजी शाखेतील बँकिंग कामकाज प्रभावित होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी आवश्यक व्यवहारांचे नियोजन आगाऊ करावे, असे आवाहन बँकेने केले आहे.

डिजिटल सेवांचा आधार घेण्याचे आवाहन

शाखेतील व्यवहारांवर परिणाम झाला तरी ग्राहकांच्या अत्यावश्यक बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी बँकेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एटीएम, बीसी पॉइंट्स आणि अन्य डिजिटल माध्यमांचा वापर करता येणार आहे.

रोख रक्कम काढणे, पैसे भरणे, निधी हस्तांतरण किंवा इतर महत्त्वाचे व्यवहार करायचे असल्यास ग्राहकांनी ते संपाच्या आधी करून घेणे किंवा उपलब्ध डिजिटल सुविधांचा वापर करणे सोयीचे ठरणार आहे.

“गैरसोय झाल्यास आम्हाला खेद आहे. ग्राहकांचे सहकार्य आणि विश्वास कायम राहील, याची खात्री आहे,” असे आवाहन युनियन बँक ऑफ इंडिया, उदगीर शाखेकडून करण्यात आले आहे. शुक्रवारच्या संपामुळे बँकिंग व्यवहारांवर किती परिणाम होतो, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button