सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

पत्रकार बालाजी कसबे यांचा मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने वाढदिवस साजरा!

पत्रकार बालाजी कसबे यांचा मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने वाढदिवस साजरा!

​उदगीर: दैनिक ‘वास्तव वेध’ चे पत्रकार तथा ‘निर्भीड पत्रकार संघ, उदगीर’ चे सहसचिव माननीय बालाजी कसबे यांचा वाढदिवस मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांना पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
​मराठा महासंग्राम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ घन्टे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली, उदगीर तालुका अध्यक्ष राजकुमार भालेराव यांच्या नेतृत्वाखाली या वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उपस्थितांनी, “बालाजी कसबे यांच्या लेखणीतून उमटणारा प्रत्येक शब्द असाच निर्भीड आणि समाजोपयोगी राहो,” अशा भावना व्यक्त करत त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
​या वाढदिवस साजरा करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी मराठा महासंग्राम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब भाई सय्यद, जिल्हा सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा, श्रीधर जाधव सर, मीडिया प्रमुख श्रीधर सावळे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button