विजयकुमार गबाळे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र केलेल्या कार्याचा १७ सप्टेंबर रोजी गौरव

विजयकुमार गबाळे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र केलेल्या कार्याचा १७ सप्टेंबर रोजी गौरव
उदगीर : प्रतिनिधी – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविणारे AVOPA चे अध्यक्ष विजयकुमार गबाळे यांना १७ सप्टेंबर रोजी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विजयकुमार गबाळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने मदतीचा हात दिला. गोरगरीब विद्यार्थ्यांना वही, पेन तसेच विविध शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
अहोरात्र विद्यार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती ठरला असून, पुरस्काराबद्दल विजयकुमार गबाळे यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.











































