सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसरकारी योजनासामाजिक कार्य

सौ. रोहिणी पराडकर यांची प्रदेश सरचिटणीस (महिला आघाडी) पदावर निवड

सौ. रोहिणी पराडकर यांची प्रदेश सरचिटणीस (महिला आघाडी) पदावर निवड

कोल्हापूर : ग्राहक समितीतर्फे सौ. रोहिणी अमोल पराडकर यांची प्रदेश सरचिटणीस (महिला आघाडी) म्हणून निवड करण्यात आली आहे. आजरा अर्बन बँकेच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. २८ मार्च २०२५) झालेल्या विशेष बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर संयोजक मंडळाने त्यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक सेवेचा गौरव केला.

या सोहळ्यात तानाजीराव गुंड (प्रदेश अध्यक्ष) यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुकुमार पाटील (प्रदेश संघटन), मुस्ताक मेस्त्री (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष), मनोहर लोहार (प्रदेश उपाध्यक्ष), अपर्णा पाटील (शहर अध्यक्ष महिला), दगडू खोत (जिल्हा अध्यक्ष), रमेश रेवणकर (शहर अध्यक्ष), रोशन भालेकर (युवक जिल्हा अध्यक्ष), मेघा क्षीरसागर (प्रदेश उपाध्यक्ष महिला), वंदना घाटे (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महिला) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सौ. रोहिणी पराडकर यांच्या निवडीची दखल महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांनी घेतली असून त्यांनी वार्ताहर व संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button