सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसरकारी योजनासामाजिक कार्य

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची अर्थसहाय्य योजना; मुख्य परीक्षा व मुलाखत तयारीसाठी मिळणार ₹७५ हजारांपर्यंत मदत

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची अर्थसहाय्य योजना; मुख्य परीक्षा व मुलाखत तयारीसाठी मिळणार ₹७५ हजारांपर्यंत मदत

लातूर, दि. २ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा–२०२६ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना सन २०२६–२७ मध्ये राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत सन २०२६ मध्ये यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी तसेच इतर अधिसूचित समाजांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ₹५०,००० तर मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी ₹२५,००० इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ जुलै २०२६ असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा. योजनेशी संबंधित भविष्यातील सर्व सूचना व माहिती केवळ अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन अर्ज व अधिक माहितीसाठी :”https://mahaamrut.org.in” (https://reference-url-citation.invalid/0)

तसेच अधिक माहितीसाठी अमृत कार्यालय, मयुरेश्वर अपार्टमेंट, पितृछाया बिल्डिंग, पहिला मजला, सिग्नल कॅम्प, विद्यानगर, लातूर येथे अथवा भ्रमणध्वनी : ७३९१०६५४७० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button