सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ता

पत्रकार संजय सूर्यवंशी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आ. कोहळीकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा

पत्रकार संजय सूर्यवंशी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आ. कोहळीकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा
************
भोकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने राज्यपालांना निवेदन
*************

भोकर (तालुका प्रतिनिधी) सर्वसामान्य जनतेच्या समस्या विषयी बातमी छापल्यानंतर हदगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दै. देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांना आमदार बाबुराव कोहळीकर यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिलेल्या घटनेच्या निषेधार्थ भोकर तालुका मराठी पत्रकार संघ व विविध पत्रकार संघटनांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
भोकर येथे दि. 28 मे रोजी पत्रकारांची बैठक घेऊन आमदार बाबुराव कोहळीकर यांचा निषेध करीत लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे आमदार पत्रकारांना शिवीगाळ करून धमकी देत असतील तर महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी वास्तव लिखाण केल्यानंतर आमदार यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करणे योग्य नाही त्यांच्या धमकीमुळे सूर्यवंशी कुटुंब भीतीच्या वातावरणात वावरत असून दहशती खाली सर्व कुटुंब आहे आमदार कोहळीकर यांच्या कार्यकर्त्याकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत आमदार कोहळीकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा संजय सूर्यवंशी यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे बी.आर.पांचाळ, राजेश वाघमारे, संपादक उत्तम बाबळे, अहमद भाई करखेलीकर, डॉ. मनोज गीमेकर, सिद्धार्थ जाधव, श्रीकांत देव, लतीफ शेख, विशाल जाधव, बालाजी कदम, उत्तम कसबेआदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button