आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांचेहस्ते कर्करोग मोबाईल व्हॅनचे लोकार्पण .

आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांचेहस्ते कर्करोग मोबाईल व्हॅनचे लोकार्पण .
**************
तणावमुक्त जीवन जगा आयुष्य खुप सुंदर आहे – ॲड.श्रीजया चव्हाण
**************
भोकर प्रतिनिधी: सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीने नांदेड जिल्ह्या साठी कर्करोग मोबाईल व्हॅन मिळाली आहे त्या व्हॅनचे लोकार्पण भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार.ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदशन करतांना तणावमुक्त जीवन जगले पाहीजे कारण आयुष्य खुप सुंदर असल्याचे त्यांनी सांगितले .
ग्रामिण भागातील नागरिकांना कर्करोग आणि त्याच्या लक्षणांविषयी फारशी माहिती नसते त्यामुळे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती तपासणी व उपचार करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी एक फिरते कर्करोग मोबाईल व्हॅन मिळालीआहे त्याचा मंगळवार दि . २७ मे रोजी प्राथमिक आरोग्यकेंद्र भोसी येथे दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत आ . ॲड.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . पुढे बोलतांना आ.ॲड. श्रीजया चव्हाण म्हणाल्या कुठलाही रोग असो त्याबाबतची भिती नबाळगता लवकर तपासणी करणे म्हणजे लवकर उपचार होईल कारण देवाने अतिशय सुंदर आयुष्य दिले आहे व देवानेच आपल्याकडे डॉक्टर पाठवले आहेत असा विचार करून कांहीही ताणतणाव न घेता तपासणी करून घ्यावी विज्ञान फार पुढे गेले असल्याने प्रत्येक रोगावर उपाय आहेत असे सांगून स्त्रियामध्ये सर्वाइकल कॅन्सर या गंभीर आजाराचे प्रमाण वाढले आहे हा आजार होऊच नये म्हणून आरोग्य विभागातील डॉक्टर यांनी लैंगिकदृष्ट्या सक्रीय होण्याआधी पौगंडावस्थेतल्या सर्व शाळेतील मुलीनां एचपीव्ही लस देण्याचे आवाहन केले . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . संगीता देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव देशमुख भोसीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . संतोष सुर्यवंशी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . संदेश जाधव , भोसी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ .शिवाजी राठोड , डॉ . पूनम पोटजळे , वैद्यकिय अधिकारी किनी डॉ . शारदा वागदकर, डॉ . उमेश मुंडे , भाजपा तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी सुरकुंटवाड, भगवानराव दंडवे, किशोर पाटील लगळुदकर, सभापती जगदीश पाटील भोसीकर , डॉ . अशोक माझळकर , दिलीपराव देशमुख सोमठाणकर , विशाल माने , विठ्ठल माचनवार , प्रताप देशमुख , आरोग्य अधिकारी बेंबर डॉ . गिरी,पांडूरणा डॉ . जगदिश राठोड , नारवट डॉ जंगीलवाड , सोमठाणा डॉ . नारायण डाखोरे , थेरबन डॉ उमेश जाधव , हाडोळी डॉ . विप्रमा पवार, डौर डॉ. किशन पवार प्राथमिक आरोग्य केंद्रार्तगत सर्व अधिकारी ,कर्मचारी यांची उपस्थिती होती .