सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ताशेती विषयीसामाजिक कार्य

राधाई गोशाळा लासोना येथे लवकरच सुरू होणार; गोसेवेचा नवा दीप प्रज्वलित होणार

राधाई गोशाळा लासोना येथे लवकरच सुरू होणार; गोसेवेचा नवा दीप प्रज्वलित होणार

लासोना (ता. देवणी, जि. लातूर) : श्री जालनाथ मंदिर लासोना यांच्या वतीने राधाई गोशाळेची उभारणी करण्यात येत असून लवकरच या गोशाळेचे कार्य सुरू होणार आहे. निराधार, जखमी व उपाशी गायींसाठी हे आश्रयस्थान मायेचा उबदार हात ठरणार आहे. गायींच्या संगोपनासाठी योग्य अन्न, पाणी, औषधोपचार व निवारा उपलब्ध करून देण्यासाठी ही गोशाळा उभारण्यात येत आहे. सध्या गोशाळेचे काम अंतिम टप्प्यात असून गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

राधाई गोशाळेत सध्या गोदान, चारादान तसेच औषध व इतर सेवा साहित्याच्या स्वरूपात मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. गोशाळेच्या व्यवस्थापनासाठी आर्थिक सहाय्य व स्वयंसेवकांचीही गरज असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

गायींच्या संगोपनासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन श्री जालनाथ मंदिर ट्रस्टने केले आहे.
राधाई गोशाळा लवकरच गोमातांसाठी सेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे.

“गोसेवा हीच खरी सेवा – चला, मायेचा हात पुढे करूया!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button