सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

शिवलिंग हे भगवंताचे निर्गुण निराकार स्वरूप आहे -स्वामी श्री राजेंद्रदास

शिवलिंग हे भगवंताचे निर्गुण निराकार स्वरूप आहे -स्वामी श्री राजेंद्रदास
***************

भोकर (तालुका प्रतिनिधी) मनाची असक्ती बनने म्हणजे शिवभक्ती आहे श्रद्धा मनानं चिंतन केलं तर शिवकृपा होते शिवलिंग हेभगवंताचे निर्गुण निराकार स्वरूप आहे असे विचार शिव कथा पुरान प्रवक्ते स्वामी श्रीlराजेंद्र दास देवाचार्यजी महाराज वृंदावन धाम यांनी पिंपळगाव येथील शिवपुराण कथेत बोलताना मांडले.
दत्त संस्थान मठ पिंपळगाव येथे चालू असलेल्या शिवमहापुराणकथेत 7 मार्च रोजी च्या दुसऱ्या दिवशीच्या कथेत पुढे बोलताना राजेंद्र दास स्वामी म्हणाले हरिहारात भेद करू नका ते दोन्ही एकच आहेत संसाराच्या जीवनाचक्रातून ते सोडवितात, वेदांमध्ये लिंग हे प्रतीक आहे सकळ निष्कळ हे दोन स्वरूप आहेत शिवाची पूजा अत्यंत साधी आहे बिल्वपत्र अक्षदा जल धोत्र्याचे फुल मनोभावे वाहिल्याने शिवप्रसन्न होतात आपली वाणी श्रीराम प्रभू सारखी असावी अधिक बोलून बडबड करू नये स्वतःला नेहमी लहान माना शिवजीच्या कृपेने मोक्ष मिळतो ओमकार प्रथम प्रकट झाले नंतर वेद प्रकट झाले पंचाक्षर मंत्राचा महिमा अत्यंत मोठा आहे पार्थिव श्री शिवाय शिवलिंगाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते गुरु पूजनाने आत्मशुद्धी होते प्रयागराज येथे झालेला कुंभ अत्यंत महत्त्वाचा झाला 70 करोड लोकांनी तिथे स्नान केले राजा धर्मनिष्ठ असावा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी सुंदर अशी व्यवस्था निर्माण केली हे देशाचे भाग्य आहे गौरव उद्गार स्वामीजींनी काढले तिसऱ्या दिवशीच्या कथेत पिंपळ वृक्ष बेलपत्राचे महत्व सांगून राम हरे कृष्ण शिव हे एकच आहेत हरिहर नामामध्ये भेद करू नका भगवंत संकीर्तनाने पाप नष्ट होते असेही स्वामी म्हणाले.

108 कुंडी दत्तयाग महायज्ञ: बाराशे जोडपी सहभागी
**************

पिंपळगाव येथील शिवमहापुराणकथेत 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ आयोजित करण्यात आला असून 6 ते 8 मार्च दरम्यान तीन दिवसात 1200 जोडप्यांनी यज्ञामध्ये सहभाग घेतला असून मंत्रोचाराच्या गजराने परिसर दुमदुमून गेला आहे, अत्यंत सुंदर अशी व्यवस्था यज्ञ मंडपात करण्यात आली असून भाविक भक्तांना मोठा आनंद मिळत आहे, शेवटच्या 4 दिवसांमध्ये ही भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अखंड महाप्रसाद : भाविकांची गर्दी
************

शिव महापुराण कथेमध्ये येणाऱ्या भाविक भक्त पुरुष व महिलांसाठी अखंडपणे महाप्रसाद अन्नदान व्यवस्था चालू असून दररोज हजारोंच्या संख्येने महाप्रसादाचे वाटप होत आहे अत्यंत सुंदर अशी वाटप व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक अत्यंत चांगली सेवा देत आहेत आलेल्या भाविकांना अन्नदानाची व्यवस्था होत असल्याने अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पार्किंग व्यवस्था सुरळीत झाली 
***********

शिवमहापुराण कथेच्या पहिल्या दिवशी पार्किंग व्यवस्था लांब करण्यात आली होती लोकांना मोठी अडचण झाल्याने दुसऱ्या दिवशी पार्किंग व्यवस्था जवळ करण्याचे काम समितीने केले त्यामुळे भाविकांची अडचण दूर झाली यामुळे भाविक भक्त महिला यांची अडचण दूर झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button