सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने व कै मारोतराव गणपतराव पाटील वानखेडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रतील प्रसिद्ध यूवा कीर्तनकार ह.भ.प.सचिन महाराज ढोले यांचा कीर्तन सोहळा संपन्न !

छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने व कै मारोतराव गणपतराव पाटील वानखेडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रतील प्रसिद्ध यूवा कीर्तनकार ह.भ.प.सचिन महाराज ढोले यांचा कीर्तन सोहळा संपन्न !

लोहा प्रतिनिधी , लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथे महाराष्ट्रातील युवा नामवंत किर्तनकार हभप सचिन महाराज ढोले संभाजीनगर यांच्या मधूर वाणीतून किर्तन श्रवणाचा सोहळा संपन्न झाला.
तत्पूर्वी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची आत्महत्या प्रतिबंध चळवळीचे जनक तथा शेतकरी आत्महत्या टास्क फोर्स महाराष्ट्र शासन राज्य समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते व नुकतीच स्वित्झर्लंड विश्वविद्यालया कडून ज्यांना डॉक्टरेट हि पदवी प्रदान करण्यात आली, असे डॉ.विनायक हेगाणा व तसेच श्री रत्नाकर गंगाधरराव ढगे सतत तीन वर्षे राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सलग तिन वेळा राज्यस्तरीय तृतीय व प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल. तसेच महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय शेती अभ्यास दौरा इस्रायल साठी निवड व स्थानिक शेतकर्‍यांना अहोरात्र मदत कार्य सेंद्रियशेती मार्गदर्शनासाठी, कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना “छत्रपती शिवाजीराजे रयत कल्याण पुरस्कार” रयतेच्या कल्याणाच्या विचाराने प्रेरित होऊन शेतीविषयक विधायक कार्य करणाऱ्या सृजनांच्या सन्मानार्थ. हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी वानखेडे कुटुंबीयांचे सर्व स्नेही,आप्तेष्ट, नातेवाईक, सहकारी मंडळी, बेटसांगवी येथील सर्व ग्रामस्थ भावबंध मंडळीनी उपस्थित राहुन सहकार्य करत स्नेह वाढवला त्या बद्दल आयोजकांनी उपस्थित सर्वाचे आभार व्यक्ति करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button