सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

उदगीर नगरीतील सात दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहाचे वातावरण

गणेश मंडळांच्या स्वागतासाठी शिवसेनेचा विशेष स्टॉल

उदगीर नगरीतील सात दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहाचे वातावरण

गणेश मंडळांच्या स्वागतासाठी शिवसेनेचा विशेष स्टॉल

उदगीर : प्रतिनिधी – उदगीर शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे शिवसेनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. गणेश मंडळांनी सादर केलेल्या विविध देखाव्यांचे कौतुक करून मंडळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.

गणेशोत्सवातील सामाजिक संदेश देणारे देखावे, सजावट आणि मिरवणुकीतील सहभागाचे कौतुक करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत स्टॉल उभारला आहे.

यावेळी डॉ. तानाजी चंदावार व लातूर ग्रामीण शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित आहेत.

गणेश मंडळांचे स्वागत आणि देखाव्यांना प्रोत्साहन देत विसर्जन मिरवणुकीतील उत्साहात शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

🔴 एकमुख न्यूज | उदगीर गणपती विसर्जन मिरवणूक लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button