सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

पिंपळगाव येथील भव्य दिव्य शिव महापुराण कथा सोहळ्याची यशस्वी सांगता:दीड लाख भाविकांची उपस्थिती 

पिंपळगाव येथील भव्य दिव्य शिव महापुराण कथा सोहळ्याची यशस्वी सांगता:दीड लाख भाविकांची उपस्थिती 

*************

 बालयोगी गजेंद्र चैतन्य स्वामींचे काल्याचे किर्तन   

**********

 150 क्विंटल तुपातील बुंदीचा महाप्रसाद 

**************

  गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी मानले आभार

************

 भोकर ( बी. आर. पांचाळ ) भोकर पासून जवळच असलेल्या हदगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथील दत्त संस्थान मठ येथे 6 ते 13 मार्च 2025 दरम्यान भव्य दिव्य शिव महापुराण कथा व 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता अतिशय भव्य अशा उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये चालू असलेल्या शिवमहापुराण कथेसाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती 13 मार्च रोजी या सोहळ्याची सांगता झाली. दीड लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती या सोहळ्यास लाभली होती. जवळपास 150 क्विंटल बुंदी, वरण-भात, भाजी, पोळीचा महाप्रसाद भाविकांसाठी वाटण्यात आल्याने न भूतो न भविष्यती असा हा सोहळा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला आहे.

            श्री शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ पिंपळगाव येथील परमपूज्य गोवत्स्य श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या तपस्याने पावन झालेल्या भूमीत दत्त मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर व्यंकट स्वामी महाराज यांनी भव्य शिव महापुराण कथा व्हावी असा संकल्प केला होता जवळपास 10 वर्षानंतर त्या संकल्पची फलश्रुती झाली आणि अनंत श्री विभूषित श्रीमजगद्गुरु द्वाराचार्य श्रीअग्र पीठाधीश्वर आणि मलुक पीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज यांनी कथेची तारीख दिल्याने पिंपळगाव मठ संस्थानचे व्यंकट स्वामी महाराज यांनी वर्षभरापासून या सोहळ्याच्या नियोजनाची तयारी सुरू केली या कथेस येणाऱ्या भारतातील संत महंत पीठाधीश्वर यांना आमंत्रित केले, प्रत्येक गावोगावी जाऊन भक्त मंडळी व ग्रामस्थांना आवाहन केल्याने गावागावातून मदतीचा ओघ सुरू झाला, धान्य आणि आर्थिक मदत सेवा देण्याची जबाबदारी अनेक गावांनी घेतली, मागील दोन महिन्या पूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कथा मंडपाची तयारी, संत महंत मंडळीच्या राहण्याची कुटिया, भोजन कक्षाची उभारणी, भांडार ग्रहाची उभारणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, रस्ता तयार करणे, विद्युत व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, 108 कुंडी महायज्ञ मंडप अशा अनेक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले या कामी अनेक गावकऱ्यांचे हात कामाला लागले.

भव्य शिव महापुराण कथेने दुसरा महा कुंभ भरला 

 13 मार्च रोजी सुरू झालेल्या शिव महापुराण कथेने पिंपळगाव मध्ये दुसरा महाकुंभच भरला कथा प्रवक्ते राजेंद्र दास देवाचार्य जी महाराज यांच्या सुमधुर रसाळ वाणीतून भव्य दिव्य कथा ऐकण्यासाठी 1 लाख भाविकांची उपस्थिती होती भारतातील अयोध्या वृंदावन चित्रकूट अशा विविध ठिकाणाहून 400 हून अधिक साधुसंत महंत पीठाधीश्वर कथेसाठी उपस्थित होते कथा आश्रमानाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते प्रयागराज महा कुंभानंतर पिंपळगाव मध्ये दुसरा महाकुंभ भरल्याचा अनुभव भाविकांना येत होता, दररोज रात्रीला वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते त्याचा आनंद देखील अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांनी घेतला, 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञामध्ये दररोज 400 जोडप्यांनी सहभाग देऊन मंत्रोचारामध्ये महायज्ञ सफल केला अनेकांना महायज्ञाचा मनस्वी आनंद झाला

150 क्विंटल तुपातील बुंदीचा महाप्रसाद: दीड लाख भाविकांची उपस्थिती 

येथील शिव महापुराण कथा सोहळ्यात दररोज अखंडपणे अन्नदान चालूच होते 1 लाख भाविक दररोज महाप्रसाद घेत होते 70 क्विंटल च्या जवळपास दररोज भंडारा चालूच होता 13 मार्च रोजी या भव्य दिव्य शिवपुराण कथेचा सांगता सोहळा झाला परमपूज्य बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या नियोजनाची प्रशंसा करून भगवंताचे चरित्र अतिशय विस्तृतपणे मांडले या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांचे पुण्य फळाला आले असेही ते म्हणाले दीड लाखाहून अधिक भाविका सांगता सोहळ्याच्या दिवशी उपस्थित होते 150 क्विंटल तुपातील बुंदीचा महाप्रसाद वरण-भात भाजी पोळी अशा प्रसादाने भाविकांचे मन तृप्त झाले.

बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी मानले आभार 

पिंपळगाव येथील दत्त संस्थान मठाचे परमपूज्य गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी अथक परिश्रम घेऊन सर्व भाविकांच्या अनेक गावच्या मंडळींच्या मदतीने हा सोहळा यशस्वीपणे पूर्णत्वास नेला यामध्ये भाविक भक्त, युवा मंडळ, महिला मंडळ, राजकीय पुढारी, समितीचे कार्यकर्ते, यांनी मोलाचे योगदान दिले त्यामुळेच हा सोहळा यशस्वी झाला. सर्वांचे योगदान या सोहळ्यासाठी मिळाले, सर्वांसाठीच हा आध्यात्मिक सोहळा होता, भव्य दिव्य आणि ऐतिहासिक सोहळा झाला, सर्वांनी मनापासून सेवा केली आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद मिळत राहो शिवप्रभू, दत्तप्रभू, विठ्ठल पांडुरंग यांची कृपा सर्वावर राहणार आहे या सोहळ्यामध्ये सहभाग दिलेल्या सर्व संत महंत मंडळी भाविक भक्तगण मान्यवर नेते पुढारी युवा कार्यकर्ते या सर्वांचे मनापासून धन्यवाद स्वामीजींनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button