अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास एक वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास एक वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा
*************
भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
*********
भोकर( तालुका प्रतिनिधी) 17 वर्षीय युवतीचा पाठलाग करून वाईट हेतूने त्रास देऊन विनयभंग केल्याप्रकरणी रायखोड येथील सतीश व्यंकटी भंडरवाड (22) या तरुणास भोकर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्षम करावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा 15 मार्च रोजी सुनावली आहे.
27 ऑगस्ट 2019 रोज 17 वर्षीय युवती सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान आई-वडील शेताकडे गेल्याने भाऊ भोकर ला गेल्याने दार बंद करून घरात एकटीच दहाव्या वर्गाचे पेपर वाचत बसली होती हे पाहून रायखोड गावातील युवक सतीश व्यंकटी भंडरवाड हा घरासमोर येऊन हाक मारून तू दार काढ तुला बोलायचे आहे तू मला आवडतेस असे म्हणून दारावर लाथा मारल्या दहा मिनिट लाथा मारणे चालूच होते मुलीने दार काढले नाही,कुणाला सांगशील तर जीव काढतो म्हणून धमकी देऊन निघून गेला. रात्री सात वाजता आई-वडील घरी आल्याने मुलीने झालेला प्रकार सांगितला मुलाच्या घरी जाऊन विचारणा करण्यात आली परंतु तो पळून गेला आई-वडिलांनी भोकर पोलीस स्टेशन येथे त्याच दिवशी येऊन फिर्याद दाखल केली. कलम 354, 506, 11, (4)12 पोकसोअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी यांनी केला, भोकर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येऊन साक्षीदार तपासण्यात आले आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायमूर्ती वाय. एम. एच. खरादी यांनी 15 मार्च 2025 रोजी आरोपी सतीश भंडारवार यास एक वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे सरकारी पक्षातर्फे एड. अनुराधा रेड्डी यांनी काम पाहिले.