भारतीय स्वातंत्र्यदिन

भारतीय स्वातंत्र्यदिन
नांदेड प्रतिनिधी – पारसेवार
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदुसा शाळेत भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.नांदुसा प्रशालेत मध्ये आज एक विशेष उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या शाळेने इतिहास, संस्कृती आणि शिक्षणाचा एक अद्भुत मिलाप प्रस्तुत करून राष्ट्रप्रेमाचा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. पारसेवार सरांनी केले. ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक आ. श्री. पौळ सरांनी केले, ज्यामध्ये नांदुसा गावचे प्रथम नागरिक सरपंच, सर्व ग्राम पंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य,शाळेतील सर्व शिक्षक आणि मान्यवर ग्रामस्थ, व माजी विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. तिरंग्याचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले, ज्याने सर्वांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत केली.
ध्वजारोहणानंतर,राष्ट्रगीत, संविधान प्रास्ताविक, प्राथना,संगितमय कवायत,लेझिम इ.शाळेचे मुख्याध्यापक श्री. पौळ सर यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे भाषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण करून दिली आणि आजच्या पिढीला त्यांच्या स्वप्नांसाठी कार्य करण्याचे प्रेरणा दिली.
या विशेष दिवशी, विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. नृत्य, गाणे, नाटक, वाचन आणि भाषणांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशभक्तीपूर्ण भावनांचे प्रदर्शन केले.
‘जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदुसा ‘च्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या कार्यक्रमाने समाजातील सर्व स्तरांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक जाणीव जागवण्याचे काम केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारसा आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या महत्वाची जाणीव होण्यास मदत झाली.शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप मा. सरपंच साहेब व राजगिरा लाडू आ.फुलारी मॅडम यांच्या मार्फत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील शिक्षिका श्रीमती अल्लापुरे मॅडम ,श्रीमती फुलारी मॅडम ,श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती गुड्डा मॅडम उपस्थित होत्या.
शेवटी समारोप श्रीमती. फुलारी मॅडम यांनी केले.