सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

नागापूर मध्ये साजरा होतो हनुमान जयंतीचा आगळावेगळा उत्सव: नवसाचे 50क्विंटल खोबऱ्याची केली जाते उधळण

नागापूर मध्ये साजरा होतो हनुमान जयंतीचा आगळावेगळा उत्सव: नवसाचे 50क्विंटल खोबऱ्याची केली जाते उधळण

**************
गावात जपली जाते सामाजिक एकता आणि धार्मिक परंपरा
**************

भोकर(बी. आर.पांचाळ)भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक परंपरेला मोठे महत्त्व आहे केवळ धार्मिक परंपरा म्हणून उत्सव साजरे केले जात नाही तर या उत्सवामुळे सामाजिक एकता व सर्वधर्मसमभाव निर्माण होतो धार्मिक वातावरणामुळे गावातील शांतता देखील टिकून राहते,असाच उत्सव भोकर तालुक्यातील नागापूर गावामध्ये हनुमान जयंतीचा साजरा केला जातो या जयंतीच्या माध्यमातून गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा करतात, विशेष म्हणजे नवसाला पावणारे हनुमान म्हणून येथील देवस्थानची ओळख आहे पूर्ण चांदीमध्ये बनवलेली मूर्ती अतिशय शोभाय मान असून भावभक्ती आणि एकतेचा संदेश इथे दिसून येतो. नवसाचे बोललेल्या 50 क्विंटल खोबऱ्याची उधळण भाविक करतात.
नागापूर गाव हे पूर्वीपासूनच धार्मिक परंपरा असणारे गाव आहे या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार रुजलेले असून गावामध्ये सामुदायिक प्रार्थना भजन सप्ताह विविध कार्यक्रम घेतले जातात गावातील हनुमान मंदिर हे सर्वांचे दैवत असून पूर्ण श्रद्धेने सारा गाव हनुमान मंदिराची पूजा अर्चा करतात.
सर्व धर्म समभावाने नांदतात गावकरी लोक 
नागपूर गावाला अनेक वर्षाची चांगली परंपरा लाभलेली असून सर्व लोक सुखी समाधानाने राहतात धार्मिक वातावरण असल्यामुळे गावा lची एकता चांगल्या प्रकारे टिकून आहे, विविध धर्मीयांचे सण-उत्सव सर्व मिळून साजरे करतात, ग्रामस्वच्छता अभियानात गावाने मोठा सहभाग घेतला असून स्मार्ट व्हिलेज स्पर्धेमध्ये गावाने बक्षीस मिळवले आहे, ग्रामस्वच्छता अभियानाचा देखील गावाला पुरस्कार मिळाला आहे, गावातील रस्ते स्वच्छ करून वृक्ष लागवड केल्यामुळे गावाची सुंदरता वाढली आहे, नाल्यांचे बांधकाम, शाळा, अंगणवाडीची सजावट, आरोग्य उपकेंद्र अशी अनेक कार्यालय गावांमध्ये आहेत शेतीला जाण्यासाठी रस्ते हवे आहेत म्हणून सर्वांनी मिळून पानंद रस्ते केले आहेत शासनाच्या विविध योजना गावांमध्ये राबविल्या जातात अनेक अधिकारी येऊन गावाला मार्गदर्शन केले आहे युवक महिला बचत गट या सर्वांचा सहभाग गावाच्या विकासासाठी लाभलेला आहे श्रमदानातून गावकऱ्यांनी गावाला स्वच्छ आणि सुंदर बनविले आहे
हनुमान जयंतीचा आगळावेगळा उत्सव होतो साजरा 
भोकर तालुक्यातील एकमेव नागापूर गावांमध्ये हनुमान जयंतीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो जयंतीच्या पूर्वी सात दिवसापासून हनुमान मंदिरात टाळ पारायण केले जाते भजनाचे कार्यक्रम देखील होतात हनुमान जयंतीच्या अगोदर मंदिरासमोर हिरवा मांडव टाकला जातो मानकरी यांच्या हस्ते पूजा करून प्रसाद चढविल्या जातो हनुमान जयंतीच्या दिवशी जन्म सोहळा अतिशय उत्साहामध्ये भजन दिंड्याच्या गजरामध्ये जयघोषाने गाव सगळा दुमदुमून जातो, चांदीमध्ये बनविण्यात आलेली हनुमानाची मूर्ती सर्वांच्या नवसाला पावते, नवस फेडण्यासाठी काहीजण साखर तुला करतात, खोबऱ्याची उधळण केली जाते, काही दागिने सोन्या चांदीचे देवाला अर्पण केले जातात, नगदी स्वरूपात देखील देणगी दिल्या जाते, जयंतीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते त्यानंतर देखील आठवडाभर पुन्हा महाप्रसाद चालूच असतो खोबरे उधळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये गावात साजरा केला जातो यामुळे सर्व भाविकांना या उत्साहाचा आनंद मिळतो नागापूर गावामध्ये साजरा होणारा हनुमान जयंतीचा आगळा सोहळा अत्यंत महत्त्वाचा उत्सव असून येथील हनुमान जयंतीच्या या सोहळ्याला अत्यंत मानाचे महत्त्व प्राप्त झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button