भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने श्रीमद भागवत कथा व राम कथेचे आयोजन

भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने श्रीमद भागवत कथा व राम कथेचे आयोजन
***************
भोकर (तालुका प्रतिनिधी) सार्वजनिक गणेश मंडळ भोकर च्या वतीने चालू वर्षाच्या गणेश उत्सवात दि.10 ते 17 सप्टेंबर दरम्यान श्रीमद भागवत कथा व श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य शिबिर,व्याख्यान,राष्ट्रीय कीर्तन असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते चालू वर्षी 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान श्रीमद् भागवत कथा सकाळी11 ते 2 या वेळामध्ये होईल भागवत कथेचे प्रवक्ते ह.भ. प.गजानन बाबा कळमनुरीकर हे राहणार असून सायंकाळी 7 ते 10 या वेळामध्ये श्री राम कथा होणार आहे राम कथेचे प्रवक्ते प.पू.बालयोगी आचार्य गजेंद्र जी चैतन्य स्वामी हे राहणार आहेत, दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये आरोग्य शिबिर होणार आहे 15 सप्टेंबर रोजी महंत प्रभाकर बाबा कपाटे यांचे व्याख्यान 3 तीन ते 5 या वेळामध्ये होईल 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये प्रा.डॉ.प्रशांत ठाकरे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे, दररोज दुपारी,2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू राहील ,दररोज सकाळी 6 ते 7 या वेळामध्ये आर्ट ऑफ लिविंग शिबिर ,12 सप्टेंबर रोजी दुपारी ,3 ते,5वा.रुद्र पूजा, सायंकाळी 6 ते 7 सामुदायिक प्रार्थना होईल,दररोज सायंकाळी6.30वा.प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय केंद्र गंदेवार कॉलनी भोकर यांचे अध्यात्मिक प्रवचन होईल या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळ भोकर यांच्या वतीने करण्यात आले आहे