मत्स्य विज्ञान महाविद्यालयात ‘लहान जलाशयातील मत्स्य संवर्धन’ तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

मत्स्य विज्ञान महाविद्यालयात ‘लहान जलाशयातील मत्स्य संवर्धन’ तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
उदगीर – मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे आत्मा, लातूर पुरस्कृत ‘लहान जलाशयातील मत्स्य संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. 11 ते 13 मार्च, 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले होते. सदरील प्रशिक्षण कार्यक्रम समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. आर. खरटमोल उपस्थित होते व यावेळी प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन त्यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रशिक्षणार्थीना आधुनिक पध्दतीने मत्स्य व्यवसाय करुन आर्थिक उत्पन्न कसे मिळवता येईल याचे मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशिक्षण समन्वयक डॉ.ए.एस.कुलकर्णी यांनी केली. प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व प्रशिक्षण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात विविध व्याख्याने, प्रात्यक्षिक व मत्स्य प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मत्स्य व्यवसाय विभाग, लातूर व मत्स्य विज्ञान महाविद्यालय,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मत्स्य डिजीटल प्लॅटफॉर्म अंतर्गत मत्स्य शेतकऱ्याची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हयातून विविध ठिकाणाहून एकूण 33 मत्स्य व्यावसायिक, मत्स्य शेतकरी व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयातील डॉ.ए.टी.मरकड, प्रा.व्ही.बी.सुतार, प्रा.एस.एस.घाटगे, डॉ.एस.आर.यादव, डॉ.एस.एन.कुंजीर, डॉ.एम.एम. गिरकर, डॉ.सुप्रिया मेश्रे, डॉ.जयश्री मठपती, श्री. सागर सातकर व श्री. बाळासाहेब सगर, मत्स्य व्यवसाय विभाग, लातूर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन कु.वैष्णवी सोनवळे व आभार प्रदर्शन कु. रेणुका चामले यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.चंद्रकांत मादळे, श्री. नितीन बिरादार, श्री. किशन घुगे आणि चतुर्थ वर्षाचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.