सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडासरकारी योजना

स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पात्र विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज साद करण्याचे आवाहन

स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पात्र विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज साद करण्याचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी –

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नूतनीकरण अर्ज साद करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतीचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज साद करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेले पात्र विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतात. जिल्हा तसेच तालुका स्तरावर ही योजना राबविण्यात येत आहे.

महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुका हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज साद करावा. विद्यार्थ्यांनी आपला यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून नूतनीकरण अर्ज पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या आवश्यक कागदपत्रांसह दुरुस्त करून साद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरनंतर नूतनीकरण अर्ज साद करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी. अर्जाची सद्यस्थिती संकेतस्थळावर तपासता येणार आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवरही यासंदर्भातील संदेश पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशाची प्रक्रियाही सुरू आहे. या अर्जांनाही ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी तत्काळ वसतिगृहासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी समाज कल्याण नांदेड विभागाचे अधिकृत समाजमाध्यम पेज samajkalyannanded हे इन्स्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करून वेळोवेळी देण्यात येणारी अधिकृत माहिती पाहावी. अनधिकृत व्यक्ती किंवा समूहांकडून माहिती घेण्याऐवजी विभागाने तयार केलेल्या अधिकृत व्हॉट्सॲप समूहात सहभागी व्हावे, असेही कळविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंकांसाठी समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button