स्वतःला समृद्ध करण्यासाठी समाज माध्यमाचा वापर करा जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे आवाहन
स्वतःला समृद्ध करण्यासाठी समाज माध्यमाचा वापर करा जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे आवाहन
मानवत प्रतिनिधी : समाजमाध्यमे ही काळाची गरज असून मोबाईल हे वरदान आहे मात्र आपण त्याचे गुलाम न बनता स्वतःला समृद्ध करण्यासाठी त्याचा वापर करून ध्येयासाठी मेहनत करा यश तुमचेच आहे असा कानमंत्र परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शनिवारी दिला.
मानवत तालुका पत्रकार संघ गणेश मंडळाच्या वतीने समाजमाध्यमाचा वापर व आजची तरुणाई या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करताना ते बोलत होतो.
शहरातील के के एम महाविद्यालयातील स्व. पन्नालालजी चांडक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव बालकिशन चांडक तर प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे, रामचंद्रराव कत्रुवार, पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना परदेशी म्हणाले की, मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करून अभ्यास तर करा पण इतर ही पुस्तके व वर्तमानपत्रे वाचा, छंद जोपासा. आदर्श हे आपल्या आजूबाजूलाच असून त्याकडे डोळसपणे बघितले तर ते आपल्याला प्रेरणा देऊन जातात.
कार्यक्रमाचे संचालन प्रा दुर्गेश रवंदे यांनी, प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा भास्कर मुंढे यांनी तर आभार पत्रकार संघाचे सचिव प्रसाद जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार, प्रा मोहन बारहाते, श्याम झाडगावकर, गोपाळ लाड, सचिन मगर, ऍड मुकुंद पाटील, दशरथ शिंदे, पांडुरंग जाधव यांनी प्रयत्न केले.