मानवत नगरपरिषद पथविक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध
मानवत नगरपरिषद पथविक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध
मानवत नगरपरिषद पथविक्रेता समितीच्या सदस्य पदाची एकूण 08 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम हा नुकताच पार पडला आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 च्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकार पथविक्रेता आणि फेरीवाले यांच्यासाठी विविध उपक्रम राबवित असून त्यामध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी निवडणूकिने निवडणे हा एक भाग होता. पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामध्ये एकूण आठ जागांसाठी सहा उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून दोन जागा ह्या रिक्त आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती (महिला) व विकलांग यांचा समावेश आहे.
सर्वसाधारण गटामधून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार श्री. तोफिक मोहम्मद रफी बागवान, श्री मोहम्मद रफी अब्दुल रहीम बागवान, तसेच सर्वसाधारण महिला राखीव मधून श्रीमती उज्वला महावीर अन्नदाते, इतर मागासवर्गीय महिला राखीव मधून श्रीमती संगीता शिवाजी धुमाळ, अनुसूचित जाती या प्रवर्गामधून श्रीमती शांता केरबा चांदणे, व अल्पसंख्यांक प्रवर्गामधून श्री मोहम्मद इरफान रऊफ बागवान, वरील सर्व प्रतिनिधींची वेगवेगळ्या प्रवर्गामधून बिनविरोध निवड झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पथविक्रेता समिती निवडणूक 2024 म्हणून मा.श्री.तुकाराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. नगरपरिषद कार्यालय मानवत या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांना सदस्यत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सदरील कार्यक्रमांमध्ये श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांनी उपस्थित नवनियुक्त पथविक्रेता समिती सदस्य यांना याविषयी माहिती देताना असे सांगितले की, मानवत शहरांमध्ये एकूण 438 नोंदणी करत पथविक्रेते (फेरीवाले) आहेत. सदरील समिती ही एकूण 20 सदस्यांची असून यामध्ये निवडून आलेले उमेदवारा व्यतिरिक्त शासकीय अधिकारी यामध्ये एक पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी, सदस्यांमध्ये एक पोलीस ठाण्याचे प्रभारी, एक स्थानिक वाहतूक पोलीस प्रभारी, एक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एक विशेष नियोजन प्राधिकराचा प्रतिनिधी, दोन सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, एक अग्रणी बँक प्रतिनिधी,एक व्यापारी संघाचा प्रतिनिधी, एक निवासी कल्याण संघाचे प्रतिनिधी, एक पणन संघाचा प्रतिनिधी, असे एकूण 20 प्रतिनिधीं सदस्यांची समिती असते.
पथविक्रेता समितीचे काम
पादचारी वर्गाला तसेच वाहतुकीस अडथळा न येऊ देणे यासाठी फेरीवाल्यांना शिस्त लावणे, पथविक्रेत्यांच्या जागा निश्चित करणे, नव्या जुन्या फेरीवाल्यांच्या नोंदणीवर लक्ष ठेवणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, कर्ज पुरवठा व प्रशिक्षणाकडे लक्ष देणे इत्यादी कामे सदरील समितीचे असतात. सदरील संपूर्ण माहिती ही श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी दिली.मानवत नगरपरिषद पथविक्रेता समिती निवडणूक 2024 निवडणूक निर्णय अधिकारी श्री तुकाराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदरील निवडणूक कार्यक्रमांमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री भारत पवार, कर निरीक्षक व निर्धारक, श्री रामराव चव्हाण, कर निरीक्षक व निर्धारक,श्रीमती. शितल सोळंके, श्री हनुमंत बिडवे, श्री जावेद मिर यांनी कामकाज पाहिले.
तसेच श्री सय्यद अन्वर, नगर अभियंता, श्री मुंजासा खोडवे, लेखापाल, श्री महेश कदम, लेखापाल, श्री भगवान शिंदे, कार्यालयीन अधीक्षक, श्री संतोष उन्हाळे, कर निरीक्षक व निर्धारक, श्री राजेश शर्मा, श्री शताणिक जोशी, विद्युत अभियंता, श्री संतोष खरात, संगणक अभियंता, श्री नारायण व्यवहारे, श्रीमती वंदना इंगोले इत्यादींचे सहकार्य या निवडणुकीसाठी लाभले.
याप्रसंगी पथविक्रेता समिती निवडणूक 2024 मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना निवडीचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या निवडणुकीमध्ये श्री हबीब भडके यांच्या विशेष प्रयत्नांमधून सदरील निवडणुकी बिनविरोध पार पडली.