सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासरकारी योजनासामाजिक कार्य

मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ. व्ही.डी.गायकवाड भारतीय संविधानामुळे संस्कृती टिकून

मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त
संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ. व्ही.डी.गायकवाड भारतीय संविधानामुळे संस्कृती टिकून

प्रतिनिधी। उदगीर : मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध प्रश्न मंजुषा व स्पर्धा व व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यामध्ये संविधान अभ्यासक प्रा.डॉ.व्ही.डी.गायकवाड यांनी भारतीय संविधान यावर प्रकाशन टाकताना म्हणाले की, “भारतीय संविधानाचे जनक” . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील लोकशाही देशांचा परिपूर्ण अभ्यास करून जे जे उपयुक्त आहे ते ते घेण्याचा प्रयत्न करून सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती केली आहे, विविधतेने नटलेल्या वद्धर्मिय भारतीयांना अपेक्षित विविध कलमांची तरतूद केली आहे. ज्यांनी आपले सर्व कार्य आणि जीवन कामगार, महिला आणि अस्पृश्यांच्या उत्थानासाठी समर्पित केले. डॉ. बी.आर. आंबेडकरांनी केवळ देशाला त्याचे संविधान दिले नाही तर भारताची मध्यवर्ती बँकिंग संस्था, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्मितीतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एक अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि कायदेतज्ज्ञ, ते भारतातील सर्वात महत्त्वाच्या चळवळींपैकी एक, दलित बौद्ध चळवळीमागील सर्वात महत्त्वाची शक्ती होते. कायदा आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. ते एक राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी होते ज्यांनी जातीव्यवस्था आणि भारताला भेडसावणाऱ्या इतर अनेक समस्यांविरुद्ध लढा दिला.
मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.बी.आर.खरटमोल अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.व्ही.डी.गायकवाड (प्राध्यापक छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर) तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ.मिंलिद गिरकर व आदी प्रा. डॉ. ए. टी. मरकड, प्रा.व्ही.बी.सुतार, प्रा.डॉ.कुलकर्णी, प्रा.एस.एस.घाटगे शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. निशांत वाकोडे, श्री. एन.एन.बाजपेयी, श्रीमती एस.ए.तांदळे, श्री.चंद्रकांत मादळे आदी उपस्थिती होते. सूत्रसंचालन कु. वैष्णवी सोनवले यांनी केले तर आभार उमेश जकोणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button