भोकरचे नवे तहसीलदार म्हणून विनोद गुंडमार यांनी स्वीकारला पदभार
भोकरचे नवे तहसीलदार म्हणून विनोद गुंडमार यांनी स्वीकारला पदभार
***********
भोकर( तालुका प्रतिनिधी) येणाऱ्या विधानसभा निवडणूक संदर्भाने 3 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार हदगाव येथे कार्यरत असलेले तहसीलदार विनोद गुंडमवार यांची भोकर येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नुकताच तहसील कार्यालयाचा पदभार त्यांनी स्वीकारला असून भोकर येथे कार्यरत असलेले तहसीलदार सुरेश घोळवे यांची शिरूर कासार जि. बीड येथे बदली करण्यात आली आहे.
तहसीलदार विनोद गुंडम वार हे भोकर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून 2007 साली प्रथम नियुक्त झाले होते त्यानंतर तहसीलदार म्हणून काही काळ त्यांनी भोकर मध्ये कार्यभार सांभाळला ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी चांगले अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले प्रशासन सेवेमध्ये देखील त्यांचा चांगला अनुभव आहे बिलोली देगलूर हदगाव येथे सेवा बजावल्यानंतर पुन्हा ते भोकर येथे तहसीलदार म्हणून नियुक्त झाले आहेत उत्तम सेवा बजावणारे अधिकारी म्हणून ते परिचित असल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे