भोकर मध्ये श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा
भोकर मध्ये श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी) येथील श्रीकृष्ण श्रीकृष्ण भगवान वाचनालय वरची श्रीकृष्ण मंदिर यांच्या वतीने परब्रह्म भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली.
5 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण मंदिरात श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त अभिषेक पूजा करून आरती करण्यात आली त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सहशिक्षक रत्नाकर विधवांस यांनी प्रास्ताविक केले, दीपक महाराज कपाटे यांनी चक्रधर स्वामींच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले यावेळी आनंदराव देशमुख,बाबुराव देशमुख,प्रभू पाटील ढवळे,गणेश पाटील मांजरे,ग्रंथपाल अरुणाताई कपाटे,ऋषिकेश कपाटे,नंदा चिलेवार,सुदाम पाटील ढवळे,भगवानराव देशमुख,गजानन शिरफुले,उनकेश्वर बोरगावे,आदि सह मान्यवरांची उपस्थिती होती सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते