बहिर्जी स्मारक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
बहिर्जी स्मारक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
वसमत/प्रतिनिधी. दि. 03/07/2024 रोजी बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथील इयत्ता 8 वीतील 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती-धारक झाले आहेत. त्यांपैकी 2 विद्यार्थी जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय क्रमांक घेऊन यशस्वी झाले आहेत. विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री प्रवीण शेळके सर, उपमुख्याध्यापिका मा. श्रीमती के. जी. भोसले मॅडम, पर्यवेक्षक श्री पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षक श्री आर. व्ही. बारसे सर, पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. जाधव मॅडम यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन केलेले स्कॉलरशिप विभागप्रमुख श्री एस. एस. भायेकर सर, श्री पी. बी. लोमटे सर यांचेही अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत-
1) शिवम भूतकर – (जिल्ह्यातून द्वितीय)
2) वरद वायचाळ – (जिल्ह्यातून तृतीय)
3) लिंबाजी ठोंबरे – (शिष्यवृत्ती धारक )
4) नवनाथ गुडेवार – (धारक)
5) पूजा महाजन – (धारक)
6) संस्कृती दासे – (धारक)
7) रितेश राखोंडे – (धारक)
8) जयदीप देशमुख – (धारक)
9) ऋतुजा पडोळे – (धारक)
या विद्यार्थ्यांचे विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिकांनीही अभिनंदन केले.
“अशाप्रकारे प्रत्येक परीक्षेत, प्रत्येक क्रीडाप्रकारात व प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश-प्राप्त्यर्थ अविरत परिश्रम केले पाहिजेत; जेणेकरून स्वत:चे, पालकाचे व विद्यालयाचे नाव उज्वल होऊ शकेल.” असे विद्यार्थ्यांना उद्देशून मा. मुख्याध्यापक साहेबांनी मौलिक मार्गदर्शन केले.