नूतन मराठी प्राथमिक शाळेचे श्रेया IAS परीक्षेत घवघवीत यश.
नूतन मराठी प्राथमिक शाळेचे श्रेया IAS परीक्षेत घवघवीत यश.
अहमदपूर :- शहरातील नूतन मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या श्रेचा IAS स्पर्धा परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. यानिमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड के. आर यांनी प्रशस्तीपत्र व बक्षीस देवून विदयार्थ्यांचे कौतूक केले.
वरद प्रकाश शेटकार याने सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच वल्लभ अशोकराव तावडे या विद्यार्थ्यांन शासनमान्य एम.टी.एस. ऑलिंपियाड परीक्षेत कास्य पदक प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांचे श्रीमती कुलकर्णी एस. एस., श्री कोतलापुरे एस.पी. श्रीमती पोलावार एस. पी. श्रीमती बेंबळे एन.एम. श्रीमती बिरादार पी.डी. श्रीमती देशमूख एम.एस. उप्परवाड एस.एथ, पुरेठेवाड एस.जी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब देशमुख व सचिव अक्षयभैया देशमुख यांनी अभिनंदन करुण विद्यार्थी याचे कौतुक केले,सर्व विद्यार्थी यशा बद्दल पालकानी सर्व गुरुजनाचे आभार मानले.