आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणशेती विषयीसरकारी योजना

काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू

काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू

कोथाळाकोल्हा ते राजुरा रस्ता मंजुरी भाजपमुळेच प्रदेश प्रवक्ते डॉ देशमुख यांची माहिती

मानवत विशेष प्रतिनिधी – मानवत तालुक्यातील कोथाळा – कोल्हा ते राजुरा या मंजूर सिमेंट रस्ता कामासह अन्य १३ रस्तकामे व पूल बांधण्याची मंजुरी भाजपच्या सततच्या पाठपुराव्याने डिसेंबर २२ मध्येच मिळाली असून काँग्रेस श्रेय लाटायचा प्रयत्न करीत आहे.  काँग्रेस उद्घाटन करीत असलेल्या ५ ऑगस्ट च्या आधीच या रस्ताकामाचे उदघाटन भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सोमवारी ता २९ भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ उमेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली .
शहरातील भाजपच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस अनंत गोलाईत ही उपस्थित होते .
याबाबत माहिती अशी की, ५ ऑगस्ट ला कोथाळा -कोल्हा ते राजुरा या ८ किमी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते होणार असून सदरील रस्ता त्यांनी मंजूर करून आणल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत .
त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ उमेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात म्हटले की , प्रा अनंत गोलाईत यांनी या मार्गासह तालुक्यातील अन्य १४ कामांची यादी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ३ वर्षांपूर्वी केली होती. तसेच याबाबत पाठपुरावाही केला होता. या निवेदनाची दखल घेत ग्रामविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक २ अंतर्गत ६ जानेवारी २०२२ ला तालुक्यातील १४ कामांना मंजुरी दिली होती. त्यापैकी कोल्हा – कोथाळा ते राजुरा या सिमेंटरस्ता कामासाठी २५ जून रोजी सात कोटी ५० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे पुराव्यासह पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच ५ ऑगस्ट च्या आधीच भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवराज नाईक, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रघुनाथ गुंजकर , तालुकाध्यक्ष विकास मगर हे उपस्थित होते .

काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

या रस्ता कामाचे उद्घाटन काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते ५ ऑगस्टला होणार असून याबाबत अधिकृत बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या असून महाविकास आघाडीच्या वतीने उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे. परंतु या रस्ता कामाबाबत भाजपने पुराव्यासह माहिती पत्रकारांना दिली असून ५ ऑगस्टच्या आधीच या रस्ता कामाचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू केल्याने काँग्रेस व भाजप मध्ये श्रेयवादाची लढाई मात्र सुरू झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button