आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

आर्य वैश्य महिला महासभेच्या वतीने अहमदपूर येथील मूकबधिर शाळेत केले खाऊ वाटप

आर्य वैश्य महिला महासभेच्या वतीने अहमदपूर येथील मूकबधिर शाळेत केले खाऊ वाटप

अहमदपुर,(प्रतिनिधी)
आर्य वैश्य महिला महासभेच्या वतीने अतिशय उत्कृष्ट रित्या उपक्रम राबवून एक वेगळीच छाप निर्माण करत म्हणजेच गरजवंताची गरज ओळखून आर्य वैश्य महिला महासभा अहमदपूर येथिल मूकबधिर शाळा आंबेजोगाई रोड, अहमदपूर येथे सुपपरिचीत व लोकप्रिय असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ माधुरी ताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा उपक्रम घेण्यात आला.तो म्हणजे अन्नदान वाटप कार्यक्रम‌ घेण्यात आला.यावेळी राखी पौर्णिमा ही साजरी केली.


म्हणतात ना कि सगळं असूनही माणूस नाही नाही करतो परंतु मनुष्य जन्म हा जरा हावरटच असतो. आज मूकबधिर शाळेत जाऊन समजले की आपल्याकडे सगळं आहे परंतु आपण किंमतच करत नाहीत.परमेश्वर परमात्म्याने अतिशय अमूल्य आहे शरीर दिलं,एक एक अवयव ज्याची आपण किंमत ही करू शकत नाही.
सगळं असूनही माणूस हा समाधानी नसतो. जीवन काय असते हे समजण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी येथे भेट दिली पाहिजे तरच माणसाला खरी किंमत कळते.भगवंताने आपणास सर्व काही दिले मग ईश्वराचे, परमेश्वराचे त्या भगवंताचे आपण अस्तित्व नाकारू शकत नाही असेही मनोगत व्यक्त केले.सदरील मूकबधिर शाळेत खाऊ वाटप करून राखी पौर्णिमा करण्यात आली.तसेच शाळेत आनंदाचे काही क्षण साजरे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ प्रतिक्षा झरकर, मार्गदर्शक श्रीमती आरती गादेवार व अहमदपूर महिला महासभेच्या सर्व सदस्य सविता चिद्रेवार, वैशाली कोसलगे, शितल मद्रेवार, अपर्णा मुक्कावार उपस्थित होत्या.
सदरील अतिशय नाविन्यपूर्ण राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे आर्य वैश्य महिला महासभ व समाजातील उच्च विद्या विभुषीत जनतेसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button