सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

उदगीरमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाईंहोळकर यांच्या ३०० व्या जयंतीला शिवसन्मानाने अभिवादन!

उदगीरमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाईं होळकर यांच्या ३०० व्या जयंतीला शिवसन्मानाने अभिवादन!

प्रतिनिधी, एकमुख न्यूज www.ekmukh.com  राज्यकारभाराचा आदर्श, जनतेच्या कल्याणासाठी जीवन वाहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त उदगीर येथील अहिल्याबाई होळकर गार्डन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती, उदगीर यांच्या वतीने करण्यात आले होते. शिवचरित्राच्या प्रभावातून जन्मलेल्या अहिल्याबाई होळकरांनी आपल्या कर्तृत्वातून संपूर्ण भारतात न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभाराची उज्ज्वल परंपरा निर्माण केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना कृतज्ञतेने वंदन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली होती. या प्रसंगी प्रा. शिवाजी देवनाळे, बिपिन पाटील, हणमंत मैत्रे, बाबासाहेब सूर्यवंशी, सतीश पाटील मानकीकर, निलेश हिप्पलगावकर, पंकज कालानी, अंकुश ताटपल्ले, विशाल दाडगे, राहुल अतनुरे, ज्ञानेश्वर बिरादार, बालाजी नादरगे, नारायण भोसले, अमृत पाटील, सचिन दापकेकर, प्रतीक शिंदे, नागेश सोलापुरे, नितीश गायकवाड, रवी मुळे, मंगेश बिरादार, प्रदीप पाटील, तानाजी गंडमळे, भरत बिरादार, लक्ष्मण बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.अहिल्याबाईंच्या जीवनकार्याचा आदर्श घेतल्यास आजच्या समाजाला दिशा मिळेल, अशी भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली. त्यांच्या कार्याचा सामाजिक-राजकीय वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी त्यांना अभिवादनाची भावना असल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button