सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रसरकारी योजनासामाजिक कार्य

मोकाट कुत्र्यासह अतिक्रमणाचा प्रश्न सोडवा विकास संघर्ष कृती समितीचे पालिकेला साकडे

मोकाट कुत्र्यासह अतिक्रमणाचा प्रश्न सोडवा विकास संघर्ष कृती समितीचे पालिकेला साकडे

मानवत प्रतिनिधी
शहरातील मुख्य रस्त्यावर महिलांसाठी प्रसाधनग्रह उभारणी यासह मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून अतिक्रमण हटवण्याची मागणी गुरुवारी ता 3 मानवत तालुका विकास व संघर्ष कृती समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली.
पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर महिलांसाठी एकही प्रसाधनगृह उपलब्ध असल्याने महिलांची मोठी कुचंबना होत असून शहरात महिलांवर्गासाठी विशेष प्रसाधन उभारावे. शहरात मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेक नागरिकांच्या जीवात धोका निर्माण झाला आहे. यासाठी शहरातील मोकाट कुत्र्यांचे तात्काळ निरबीजींकरण करून बंदोबस्त करावा. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरील ठिकठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे तात्काळ हटवून वाहतुकीची कोंडी कमी करावी.
यावेळी निवेदन देताना समितीचे अध्यक्ष डॉ विजयकुमार तोष्णीवाल, कार्याध्यक्ष प्रसाद जोशी, सचिव श्याम झाडगावकर, उपाध्यक्ष गोपाळ लाड, कृष्णा बाकळे, प्रकाश करपे, बालाजी पोकळे, कपिल उदावंत, विलास बारहाते, रामनिवास सारडा, गोपाळ पल्लोड, गोविंद ढमढेरे, संजय नाईक, मोहन बारहाते, डॉ राजकुमार लड्डा, पांडुरंग जाधव, एड मुकुंद पाटील, सूर्यप्रकाश तिवारी आदिजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button