पिक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा – पण सरकारचं पोर्टल ठप्प! शेतकऱ्यांचा संयम संपत चाललाय!

पिक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा – पण सरकारचं पोर्टल ठप्प! शेतकऱ्यांचा संयम संपत चाललाय!
प्रतिनिधी, एकमुख न्यूज | www.ekmukh.com
महाराष्ट्र | ९ जुलै २०२५
महाराष्ट्रभर शेतकरी पिक विमा घेण्यासाठी सीएससी सेंटरवर रांगेत उभे आहेत… आणि सरकारचं पोर्टल मात्र वारंवार बंद पडतंय! कधी आधार वेरिफिकेशन होत नाही, कधी मोबाईल ओटीपी येत नाही, तर कधी सातबारा माहितीच पोर्टलवर दिसत नाही. हे रोजचं नाटक सुरू आहे – आणि त्याचा थेट फटका भोळ्या शेतकऱ्यांवर बसतो आहे.
🧑🌾 विमा भरायला हजारो रुपये तयार… पण पोर्टल मात्र गारद!
शासनाने ‘एक रुपयाचा विमा’ बंद केल्यावरही शेतकरी हजारो रुपयांपर्यंत रक्कम भरून विमा काढण्यास तयार आहेत. पावसाअभावी डबल पेरणीचा फटका बसलेला शेतकरी विमा हाच शेवटचा आधार मानतो. पण सरकारचं पिक विमा पोर्टलच जबाबदारी पार पाडू शकत नाही, हे या यंत्रणेचं थेट अपयश आहे.
⚠ सीएससी सेंटर आहेत, जागा आहेत, साधनं आहेत – पण पोर्टलचं काय?
आधार व मोबाईल वेरिफिकेशन अडथळ्यामुळे अर्धवट प्रक्रिया
सातबारा माहिती असली तरी पोर्टलवर दाखवत नाही
फार्मर आयडी दिसत नाही
सबमिट करताच सिस्टिम हँग
📢 हे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का?
‘डिजिटल इंडिया’, ‘शेती सशक्तीकरण’ अशा गगनभेदी घोषणांमागे सरकार लपलं आहे. पण जेव्हा पोर्टल वेळेवर काम करत नाही, तेव्हा शेतकऱ्यांचा संयम तुटतो. हे केवळ उदगीर, लोहा, उस्मानाबाद, लातूर, बीड नाही – तर संपूर्ण महाराष्ट्राचं वास्तव आहे.
🛑 शेतकऱ्यांचा विश्वास, वेळ आणि पैसा वाया घालवणाऱ्या या पिक विमा पोर्टलवर सरकारने तात्काळ कारवाई करावी.
फक्त योजना जाहीर करून फोटो काढणं पुरेसं नाही – ती योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचते का, हे महत्त्वाचं!
— प्रतिनिधी, एकमुख न्यूज
🌐 www.ekmukh.com