सावळीला शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना
सावळीला शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना
अध्यक्षपदी बाळासाहेब काळे यांची निवड
मानवत प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील सावळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी शालेय व्यवस्थापन समिती निवड कार्यक्रम मुख्याध्यापक श्री इक्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आली.
या कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून सावळी गावचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील मा. श्री बाळासाहेब तुकाराम काळे. उपाध्यक्ष म्हणून सिद्धेश्वर भीमराव काळे तर सदस्य म्हणून नितीन काळे, माऊली काळे, रामेश्वर घागरे, सौ. मिरा उद्धव काळे, सौ. संगिता बाळासाहेब काळे, सौ राधिका भागवत काळे, सौ गोदावरी सर्जेराव काळे,रत्नमाला विनायक कांबळे सोनाली पांडुरंग काळे, गणेश भगवान काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच सौ अनुजा माणिकराव काळे , उपसरपंच गोपाळ(आबा) भगवानराव काळे, गोविंदराव काळे, रामेश्वरराव (पप्पुभाऊ) काळे, ग्रामसेवक कानडे, दत्तराव काळे, विठ्ठल काळे, नामदेव काळे, माणिक काळे, महादेव काळे, सुरेश काळे, केशव काळे, गोविंद काळे, भरत काळे, विष्णु काळे, कल्याण वैराळ, कृष्णा वैराळ, बाळासाहेब तुपसमिंद्रे, शाळेतील शिक्षकवृंद मुख्याध्यापक इक्कर बी. एस. निलपत्रेवार, मेहत्रे ए. जि., कार्ले सुचिता , शिंदे कविता चव्हाण डी. बी, जल्लारे व्ही. एन ,परदेशी जी. एम. आदीजण उपस्थित होते.