भोकर तालुका सरपंच संघटनेची दुसरी कार्यकारिणी अध्यक्षपदी माधव अमृतवाड उपाध्यक्ष उमेश फुगले
भोकर तालुका सरपंच संघटनेची दुसरी कार्यकारिणी अध्यक्षपदी माधव अमृतवाड उपाध्यक्ष उमेश फुगले
***************
भोकर (तालुका प्रतिनिधी) भोकर तालुका सरपंच संघटनेची भाजप प्रणित कार्यकारिणी यापूर्वी घोषित करण्यात आली होती त्यानंतर पुन्हा दुसरी भोकर तालुका सरपंच संघटना कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी माधव अमृतवाड व उपाध्यक्षपदी सुमेश फुगले यांची निवड करण्यात आली आहे.
मागील अडीच वर्षापासून कार्यरत असलेली सरपंच संघटना बरखास्त झाल्यानंतर भाजपा प्रणित सरपंच संघटनेची कार्यकारणी निवडण्यात आली होती मात्र काही दिवसानंतर दुसरी संघटना 21 सप्टेंबर रोजी स्थापन करण्यात आली त्या संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून माधवराव गंगाधरराव अम्रतवाड उपाध्यक्षपदी सुमेश नारायण फुगले सचिव पदी सुनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ मा.सरपंच लक्ष्मणराव नागण पालेपवाड व प्रमुख पाहुणे म्हणून सौ.कांताबाई बालाजी कुंचलवाड, भोकर मार्केट कमेटीचे संचालक कृष्णा वागदकर, यांची उपस्थिती होती इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे कोषाध्यक्ष नितीन गणपत चौरेकर ,राजु उत्तम बुलबुल, राजेश दत्ता मचकंठे लक्ष्मणराव नागण पालेपवा, सौ. कांताबाई बालाजी कुंचलवाड ,मंगिलाल जाधव.राजकुमार परमेश्वर वाकदकर… रामदास तुळसिराम जोंधळे,विलास तुळसिराम गुंडेराव मार्गदर्शक अंबादास अटपलवाड आदींची निवड करण्यात आली