पर्यावरण पूरक गणेश मूर्ती उत्सव
पर्यावरण पूरक गणेश मूर्ती उत्सव
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत निसर्गाशी संबंधित पंचतत्वातील भूमी, वायु, जल, अग्नि, आकाश या तत्वाशी संबंधित] मानवत नगरपरिषद व कस्तुरबा गांधी विद्यालय मार्फत पर्यावरणपुरक (इकोफ्रेंडली. माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणे कामी जनसामान्यांत सकारात्मक भावना तसेच जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने लाल माती/ शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचा उपक्रम मानवत नगरपरिषद हद्दीतील कस्तुरबा गांधी विद्यालय येथे दिनांक ०४ /०९ /२०२४ रोजी मा.मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे नगर परिषद मानवत यांच्या मार्गदर्शना खाली आयोजीत करण्यात आले होते .
पर्यावरणाचे संरक्षण करणे साठी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालय मानवत येथे उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर, सुबक अशा शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविल्या.या वेळी मा मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी सर्व विद्यार्थी व नागरीकांना इकोफ्रेंडली गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच ०१)श्री गणेशाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचा वापर टाळा.०२)डेकोरेशन / मखर/आरास / सजावट / साठी वापरात येणारे जि प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर टाळा०३)शाडुच्या किंवा पेपर पासून व नैसर्गिक रंगापासून तयार केलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचा वापर करा.०४)श्री गणेशाच्या पुजाविधी नंतर निर्माण झालेले निर्माल्य प्लास्टिक मध्ये बांधून नदींमध्ये टाकू नका.०५)श्री गणेशाचे विसर्जन नदीमध्ये नकरता कृत्रिम तलावामध्ये करा जेणेकरून पाण्याचे प्रदूषण होणार नाही.०६)कृत्रिम तलावात विसर्जन केलेल्या मूर्तीचा पुनर्वापर करता येईल याकडे लक्ष द्या.मिरवणुकीच्या वेळी ध्वनिक्षेपक आणि डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील वाद्यांचा व फटाक्यांचा वापर करु नका असे संदेश देखील मा.मुख्याधिकारी यांनी असे संदेश शहरातील नागरी व विद्यार्थी यांना दिला