आर्य वैश्य लातूर जिल्हा महासभा तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
आर्य वैश्य लातूर जिल्हा महासभा तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
लातूर,(प्रतिनिधी)
आर्य वैश्य लातूर जिल्हा महासभा वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच पुढे असतो. नेहमी प्रमाणेच समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आर्य वैश्य महासभेच्या वतीन माधुरीताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून ज्ञानज्योती प्राथमिक शाळा लातूर येथे झेंडावंदन करून तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कापडी पिशवी वाटप केले.वरचेवर पर्यावरणाचे समतोल बिघडत असल्याचे दिसून येत असल्यामुळे पर्यावरण संतुलन टिकून राहण्यासाठी व ती काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजून सांगितले.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लातूर जिल्हा महिला महासभेच्या अध्यक्षा मीराताई देवशेटवार यांची उपस्थिती होती.तसेच महिला महासभेच्या सदस्या मंजुषाताई पारसेवार, उषा बट्टेवार, हर्षा देवशेटवार ,ज्ञानज्योती प्राथमिक शाळेचा स्टॉप उपस्थित होता.या स्तुत्य, समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सदरील उपक्रमाबद्दल आर्य वैश्य समाजाच्या वतीने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.