शेतकऱ्यांना पीक विमा कोणतीही अट न घालता सरसकट द्या अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
शेतकऱ्यांना पीक विमा कोणतीही अट न घालता सरसकट द्या अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
________________
प्रतिनिधी/ भोकर
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ३ सप्टेंबर पर्यंत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तक्रार अर्ज कृषी खात्याकडे दाखल करावे असे आदेशित केले असताना काही कृषी कर्मचारी डाकेट आयडी नंबर असणार्या नीच अर्ज करावे इतर शेतकऱ्यांनी अर्ज करु नये असे सांगितले तेव्हा असता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर व काही शेतकऱ्यांनी या बाबत जाब विचारला असता अर्ज सर्वांचेच घेण्यास सुरुवात केली असून कुठले ही अट न टाकता शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईं देण्यात यावी अन्यथा शिवसेना व शेतकऱ्यांच्या वतीने उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे कृषी विभागाकडे दि.२६ ऑगस्ट रोजी देण्यात आला.
कृषी विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी पिक विमा दरवर्षी भरतात.पण विम्याचा लाभ मात्र ५ ते १० टक्केच लोकांना मिळतो तर उर्वरित ९० टक्के लोक या पासून वंचित राहत आहेत. सन २०२३ सालात सप्टेंबर महिन्यात सातत्याने २२,२३ व २४ पर्यंत अतिवृष्टी झाली.यात शेतातील पिके पुर्णतः नष्ट झाली होती.होत्याच नव्हतं झालं.यात काही शेतकरी ७२ तासात आँनलाईन क्लेम केले आहेत.तर बाकिच्या शेतकऱ्यांना नेट अभावी क्लेम करता आले नाही.पाणी व पिकांची परिस्थिती पहाता कर्मचाऱ्यांनी सरसकट पिक विमा मिळणार असल्याचे सांगितले.तेव्हा शेतकऱ्यांनी आँनलाईन क्लेम केले नाही.त्यामुळे विमा सर्व शेतकऱ्यांना सरसकट द्यावे. केवळ कंपनीचा फायदा पाहु नये. तसेच ३ तारखेच्या निर्णयानंतर सरसकट विमा न दिल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे कृषी मंडळ अधिकारी आर.बी.मिसाळ व जे.व्ही.पाईकराव यांना देण्यात आला. या निवेदनावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर व भोकर रूरल कंपनी चे अध्यक्ष माधव पा.सलगरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता बोईनवाड, राॅकाचे (अजितदादा) प्रकाश बोंदीरवाड, मारोती पवार, संचालक जळबा क्षिरसागर, संचालक व्यंकट हामंद, दत्तात्रय चटलावार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.