महाशिवपुराण’साठी प्रशासनाचे जीवाचे रान
महाशिवपुराण’साठी प्रशासनाचे जीवाचे रान
नांदेड : येथील कौठा परिसरातील मोदी ग्राऊंडवर आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा सोहळ्यात शुक्रवारच्या अतिवृष्टीमुळे मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. मैदानावर पाणी आणि चिखल साचल्यामुळे महाशिवपुराण कथा ऑनलाईन सुरू झाली आहे. मात्र हे मैदान पूर्ववत करून हा कथा सोहळा पुन्हा नियोजित कार्यक्रमस्थळीच सुरू करण्यासाठी प्रशासनानी जीवाचे रान केले आहे. हे कार्यक्रमस्थळ पूर्ववत करण्यासाठी कंबर कसण्यात आली असून निसर्गाने साथ दिल्यास लवकरच पंडित प्रदीप मिश्रा हे लाखो भाविकांच्या साक्षीने महादेव कथेचे वाचन करताना दिसून येतील अशी अपेक्षा आहे.
महाशिवपुराण सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी अथक प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यआयोजक डॉ. शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार, काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार, संजय कऱ्हाळे, पिंकू पोकर्णा, संतोष पांडागळे, बालाजी पांडागळे, शंकर जाधव, डॉ.गुंडावार यांनी सभामंडपातील पाणी निचरा करून हा महाशिवपुराण सोहळा यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. उद्या दि. 25 रोजी हा सोहळा ऑनलाईन होत असला तरी दि. 26 पासून पुढील तीन दिवस नियमितपणे भाविकांना कथा ऐकता यावी, याचे नियोजन करण्यात येत आहे. मंडपात शिरणारे पाणी अन्य दिशेला वळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.