आदिवासी अधिकारी , लोक प्रतिनिधी यांच्या प्रतिमेस जोडे मारणाऱ्यावर गुन्हे दाखल करा ; आदिवासी समाजाची मागणी
आदिवासी अधिकारी , लोक प्रतिनिधी यांच्या प्रतिमेस जोडे मारणाऱ्यावर गुन्हे दाखल करा ; आदिवासी समाजाची मागणी
भोकर प्रतिनिधी : पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारूड, आमदार डॉ . किरण लाहमटे, लक्कीभाऊ जाधव यांच्या प्रतिमेस गैर आदिवासी समाज कंठकांनी जोडे मारो आंदोलन करून अवहेलना केली यांचेवर ॲट्रासिटी गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन बिरसा मुंडा समाजिक विकास समितीच्या वतीने देण्यात आले.
सोमवार दि .१९ रोजी बिरसा मुंडा सामाजिक विकास समिती व आदिवासी समाज बांधव यांनी निवेदन दिले असून जागतीक आदिवासी दिनी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त आ .डॉ .किरण लाहमटे, लक्कीभाऊ जाधव यांच्या प्रतिमांना गैर आदिवासी समाज कंठकानी जोडे मारो आंदोलन करून अवहेलना केली त्या समाज कंठकाचा शोध घेऊन त्यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा, आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या विरोधातील गुन्हा रद्य करून त्यांची बदली करू नये यासाठी तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्या साठी निवेदन दिले आहे. निवेदनावर अध्यक्ष डॉ. अशोक माझककर, प्रा. डॉ. कमल फोलो, दामेश्वर माझळकर, परमेश्वर वागतकर, माजी सभापती शिवाजी देवतुळे, धोंडीबा भिसे, संचालक कृष्णा वागदकर, माधवराव माझळकर, सौ . संध्या भुरके, अनुसया मेंडके, तुकाराम हुरदुखे, घनशाम खुपसे, राजू बुलबुले, शेषराव वागदकर, दिलीप खरोडे तुकाराम वागदकर आदिनच्या स्वाक्षऱ्या आहेत.