महिलांना सक्षम करण्याचे काम महायुती सरकारकडून होत आहे- महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
महिलांना सक्षम करण्याचे काम महायुती सरकारकडून होत आहे – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बहिण योजना यासह अनेक योजना महायुती सरकारकडून राबविण्यात येत असून महिलांना सक्षम बनविण्याचे काम हे सरकार करीत असल्याचे मत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी भोकर येथील महिला संवाद मेळावा व युवक मेळाव्यात बोलताना केले.
भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांच्या पुढाकारातून महिला संवाद मेळावा व युवक मेळाव्याचे आयोजन,7ऑगस्ट रोजी मोंढा मैदानातील शेडमध्ये करण्यात आले होते प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक तालुका अध्यक्ष राजेश कदम यांनी केले, जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार यावेळी बोलताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जिल्ह्यासह तालुक्यात सक्षमपणे काम करत असून युवकांची फळी निर्माण करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपण आणखी जोमाने काम करू असे मनोगत व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पक्षाचे भूमिका सांगून राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रभर पक्ष जोमाने काम करत आहे जनतेची कामे चांगल्या प्रकारे होत असल्याचे मत मांडले पुढे बोलताना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे म्हणाल्या भोकर मध्ये संवाद सत्र चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात 2.50 लाख अर्ज प्राप्त झाले असून आणखी अर्ज येणाराच आहेत भोकर तालुक्यात 21 हजार 852 अर्ज आले असून 18000 अर्जांना मंजुरीही देण्यात आली रक्षाबंधनाला महायुती सरकार भावाकडून लाडक्या बहिणीचे ओवाळणी मिळणार आहे प्रत्येकाच्या खात्यात पैसे पडतील विशेष करून महिलांच्या वैयक्तिक खात्यात पैसे जाणार आहेत लाडक्या भावासाठी सुद्धा योजना करण्यात आली आहे महिलांना अधिक सक्षम बनविण्याचे काम महायुती सरकार करीत आहे युवकांसाठी प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे असे सांगून अंगणवाडी सेविकांच्या मागण्या आहेत त्याचा विचार शासनाकडून चालू आहे त्यांचे मानधन व इतर मागण्या याबाबत सुद्धा सरकार सकारात्मक विचार करीत आहे असेही त्या शेवटी म्हणाल्या